11 वर्षीय अमुल्या शाहची जलतरणात सुवर्ण झेप
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 30
चार प्रकारांत चार सुवर्णपदकांची कमाई
नवी मुंबई : नवीन पनवेल मधील 11 वर्षीय अमुल्या प्रसाद शहा हिने अलिबाग येथील के. नामिताई ठाकूर क्रीडा संकुलात आयोजित प्रेसिडेंट ट्रॉफी स्विमिंग कॉम्पीटेशन 2026 स्पर्धेत दैदिफ्यमान कामगिरी करत चार सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी किंवा कठीण सराव अशा कोणत्याही आव्हानांना न जुमानता तिने सातत्य कायम ठेवत हे यश संपादन केले.
नवीन पनवेल येथील एमएनआर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱया अमुल्याने स्पर्धेतील फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या चारही जलतरण प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत 4 सुवर्णपदके आणि 4 विजेतेपदाच्या ट्रॉफी जिंकून आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. अमुल्याच्या या उल्लेखनीय यशामागे तिची कठोर मेहनत, नियमित सराव, शिस्त आणि जिंकण्याची प्रबळ जिद्द असल्याचे प्रशिक्षक आणि पालकांनी सांगितले. अमुल्याच्या या यशाबद्दल एमएनआर इंटरनॅशनल स्कूल तसेच नेरे गावातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai