बालचित्रकारांनी साकारली कल्पक रंगचित्रे
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 57
नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘बाल चित्रकला स्पर्धा’ या राज्यस्तरीय उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपल्या मनातील कल्पनांना रंगाच्या माध्यमातून चित्ररूप दिले.
नमुंमपा शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनास अनुसरून या स्पर्धेमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील 3703 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांमधील कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव देत त्यांचा विकास करण्याकरिता तसेच महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 14 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार या बाल चित्रकला स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. इयत्ता दहावीपर्यंत 4 गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बाल चित्रकला स्पर्धेचे विषय शासन निर्देशानुसार स्पर्धेच्या वेळीच जाहीर करण्यात आले. इयत्ता दहावी पर्यंत 4 गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली असून विजेत्या विद्यार्थी स्पर्धकांना 14 नोव्हेंबर 2026 रोजी म्हणजेच बाल दिनाच्या दिवशी गौरविण्यात येणार आहे. बाल चित्रकला स्पर्धेच्या दिवशी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai