मोल एक्सपर्ट पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 29
नागरिकांना आधुनिक वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध होणार
पनवेल ः महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘मोल एक्सपर्ट पॅथॉलॉजी लॅब’ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 कोळीवाडा सुरू करण्यात आली आहे. या लॅबचा उद्घाटन समारंभ नुकताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, महापालिकेच्या या लॅब मुळं रुग्णांच्या आजारचे निदान लवकर होणार आहे. महापालिका दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊले उचलत आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रूग्णांना योग्य उपचार देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन. प्राथमिक उपचारानंतर आता पुढील टप्प्यावरील आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध होऊया असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने मोल एक्सपर्ट इन्फेक्शस डिसीज अँड मॉलिक्युलर लॅबोरेटरी यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमध्ये रक्त तपासणी अंतर्गत मलेरिया, डेंग्यू, हिमोग्लोबिन अशा विविध 132 विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. यावेळी महापौर नितीन पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’चे सभापती अजय बहिरा, महापालिका सदस्य दर्शना भोईर, डॉ.अरुणकुमार भगत, प्रिती जॉर्ज,सुमित झुंजारराव, अस्मिता घरत, आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
K. Krishnan
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai