अडथळामुक्त पदपथ मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 22
नवी मुंबई ः सर्वोच्च न्यायालय यांनी नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार ‘अडथळामुक्त पदपथ’ हा नागरिकांचा अधिकार आहे. यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विशेष बैठक आयोजित करीत सर्व विभागांमध्ये विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले होते. महापौर सुजाता पाटील यांनीही अंमली व नशिल्या पदार्थांविरोधात मोहीम राबविण्याचे निर्देशित केले होते. त्यास अनुसरून सोमवारपासून सर्वच विभाग कार्यालयांमार्फत धडक मोहीम हाती घेण्यात आली.
विशेष म्हणजे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: फिल्डवर उतरत विभाग कार्यालयांमार्फत होणाऱ्या अडथळामुक्त पदपथ मोहीमेंतर्गत सुरू असलेल्या कारवाईची प्रत्यक्ष पाहणी केली. वाशी व नेरूळ येथील कारवाईप्रसंगी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संजय शिंदे, परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे तसेच सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी वाशी सुखदेव येडवे आणि नेरूळ डॉ.अनुराधा बाबर उपस्थित होते. आयुक्तांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार अडथळामुक्त पदपथ अंतर्गत पदपथावर कोणत्याही स्वरूपात अधिकृत/अनधिकृत अडथळा असायला नको या अनुषंगाने पदपथावरील अधिकृत फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे तसेच पदपथावरील अनधिकृत फेरीवाले यांना हटविणे अशा प्रकारच्या मोहीमचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयाने याबाबतचा कृती आराखडा तयार केला. त्यामध्ये रस्त्यांच्या बाजूच्या पदपथांचे सर्वेक्षण करण्यात आले. कारवाई कोणत्या पदपथांवर करावयाची याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. त्याची आखणी करून कारवाईसाठी पथके तयार करण्यात आली व प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात करण्यात आली. आयुक्तांनी वाशी सेक्टर 9 व 10 तसेच नेरूळ से.29 व से.3 आणि से.30 मधील मार्जिनल स्पेस व फेरीवाल्यांवरील कारवाईची पाहणी केली. विभाग कार्यालयांमार्फत सुरू असलेली ही कारवाई अशीच सुरू राहणार असून त्याचा प्रभाव कायम राखण्याच्या दृष्टीने त्यात सातत्य राखले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai