खारघरमध्ये योग-निसर्गोपचार राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 27, 2026
- 30
दुसऱ्या दिवशी सामूहिक योगाभ्यास, संकीर्तनाची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
खारघर : व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसह युवकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि योग व निसर्गोपचाराच्या माध्यमातून निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने खारघर येथे आयोजित करण्दोयात आलेला दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात पार पडला. तर रविवारी सेन्ट्रल पार्क मध्ये पार पडलेल्या सामूहिक योगाभ्यास, संकीर्तन आंतरराष्ट्रीय एक्सलन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमाने विशेष लक्ष वेधले.
खारघर येथील डॉ. जी. डी. पोल फाउंडेशनमध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, सूर्या फाउंडेशन आणि डॉ. जी. डी. पोल फाउंडेशन यांच्या सहकार्याने शनिवार आणि रविवार आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवाद मध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय व्यावसायिक, संशोधक आणि योग-निसर्गोपचार क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांचा व्हिडिओ संदेश सादर करण्यात आला.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिसंवादाच्या शिस्तबद्ध आयोजनाचे आणि वेळेच्या काटेकोर नियोजनाचे विशेष कौतुक केले. दरम्यान परिसंवादाच्या पहिल्या दिवशी डॉ. दुर्गादास सावंत, डॉ. संतोष पांडे, गुरुमाँ योगिता खत्री, डॉ. गुलाब तेवानी आणि डॉ. गोविंदा कुमार त्रिवेदी यांनी तीव्र आजारांवरील निसर्गोपचार, वेदनांचे प्रतिबंध व व्यवस्थापन, योग-निसर्गोपचार आणि भावी पिढीसाठी आध्यात्मिक ज्ञान, जीवनशैलीशी संबंधित विकारांचे व्यवस्थापन आणि योग-निसर्गोपचाराच्या माध्यमातून मधुमेह व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी व्यसन प्रतिबंध, व्यसन व्यवस्थापन व पुनर्वसन, उपवास चिकित्सा, असंसर्गजन्य आजारांचे एकात्मिक व्यवस्थापन, योग-निसर्गोपचारातील वैज्ञानिक संशोधन आणि पारंपरिक ज्ञान या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याशिवाय संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन आणि मानवी संबंध यांसारख्या विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.
- सामूहिक योगाभ्यासचा आंतरराष्ट्रीय एक्सलन्स बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद
सामूहिक योगाभ्यास, संकीर्तन आंतरराष्ट्रीय एक्सलन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डरविवार खारघर मधील सेन्ट्रल पार्क मध्ये सामूहिक योगाभ्यास, संकीर्तन पार पडले या योगाभ्यास मध्ये महाराष्ट्र सह विविध राज्यातील नागरिक सहभागी झाले होते. या योगाभ्यास संकीर्तनाची नोंद आंतरराष्ट्रीय एक्सलन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर ,डॉ संदीप सिंग यांच्यायासह येरला आयुर्वेदिक महाविद्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai