डब्ल्यूएसओ इंडियातर्फे राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन फोटो
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 27, 2026
- 36
नवी मुंबई : व्यवसायिक विकास, ज्ञान-आदानप्रदान आणि व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण (ओएचएसइ) पद्धतींच्या प्रगतीवर भर देण्यासाठी वर्ल्ड सेफ्टी ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) इंडियाच्या वतीने नुकतेच एका विशेष राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम वर्ल्ड सेफ्टी ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ), अमेरिका येथील संचालक मंडळाचे सदस्य आणि डब्ल्यूएसओ भारत राष्ट्रीय कार्यालयाचे अध्यक्ष व संचालक सी. कन्नन यांच्या नेतृत्वाखाली, तसेच डब्ल्यूएसओ भारत राष्ट्रीय समितीच्या सदस्यांच्या सहकार्याने आयोजित व संचलित करण्यात आला. या सोहळ्यास मलेशियन ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष. लिम तियान सांग आणि भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाचे ऊॠऋअडङ्ख चे निवृत्त महासंचालक जी.एम.ई.के. राज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या परिसंवादादरम्यान उद्योगांमधील परस्पर सहकार्य, सुरक्षा व्यावसायिकांचे योगदान आणि कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या नवीन धोके व आव्हानांना तोंड देण्यासाठी स्व-बदलाच्या गरजेवर चर्चा करण्यात आली. डब्ल्यूएसओ इंडियाने भारतीय उद्योगांमध्ये ओएचएसइ व्यवस्थापनातील निरंतर सुधारणांना चालना देण्याच्या आपल्या भूमिकेला या माध्यमातून अधिक बळकट केले. या सोहळ्यात सुरक्षा, आरोग्यदायी वातावरण आणि पर्यावरणीय जबाबदारी जपणाऱ्या एकूण 199 विजेत्यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान केवळ एक यश नसून, संस्था आणि उद्योगांमध्ये सुरक्षेची संस्कृती बळकट करण्याच्या प्रयत्नांची पोचपावती ठरली. ओएचएसइ क्षेत्रात अर्थपूर्ण प्रगती साधण्यासाठी सामूहिक कृती, व्यावसायिक सहकार्य आणि निरंतर सुधारणा अत्यंत आवश्यक असल्याचे मत या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai