पनवेलमध्ये 9 कोरोनाग्रस्त
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2020
- 507
पनवेल : कोरोनाग्रस्त डॉक्टर पत्नीच्या संपर्कात आल्याने पतीला कोरोना झाल्याची बाब उघड झाली आहे. दोघेही पती पत्नी खारघर मधील रहिवासी आहेत. सध्याच्या घडीला दोघांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
पनवेल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 9 झाली आहे.यामध्ये कामोठे मधील 2, कळंबोली मधील सीआयएसएफचे जवान असलेले 5 व खारघर मधील दाम्पत्याचा समावेश आहे. खारघर मधील कोरोनाग्रस्त महिला नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात डॉक्टर आहे. या महिलेच्या संपर्कात आल्याने पतीला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे संबंधित कोरोनाग्रस्त महिला डॉक्टर कोणाच्या संपर्कात आली आहे का ? याबाबत चौकशी करण्याची गरज आहे. खारघर मध्ये या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या बाबतीत उलट सुलट अफवा पसरत असताना आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना अफवांना बळी न पाडण्याचे अवाहन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai