भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 19, 2021
- 1184
मुंबई : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला चौथ्या कसोटी सामन्यात धूळ चारली आहे. टीम इंडियानं ब्रिस्बेन कसोटीत पराभुत करत ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने शानदार कामगिरी केली. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर सर्व क्षेत्रातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील, असे ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.
आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांच आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या 56 धावांच्या जोरावर पूर्ण केले. दुसर्या डावात शुभमन गिलंनं 91 धावा केल्या. कॅप्टन अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतनं आक्रमक फलंदाजी करत 138 चेंडूमध्ये 9 चौकार, एक षटकारासह 89 धावांची विजयी खेळी केली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी यांच्या साथीनं मैदानावर तळ ठोकून उभं राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला तर विकेटकिपर रिषभ पंतनं विजयाचा कळस रचला आहे. शुभमन गिलंन 91 धावा केल्या तर रिषभ पंतनं 89 धावा करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चौथ्या कसोटी सामन्यासह टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा कायम ठेवला आहे. भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक मार्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.
शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी दुसर्या डावांत 9 बळी घेत ऑस्ट्रेलियाला 294 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक आणि संयमी फंलदाजी करत विजय खेचून आणला. ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai