भाजप नगरसेवक संजय भोपी यांचे कोरोनामुळे निधन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचे आज निधन झाले. गेल्या दोन महीन्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईला पुन्हा सज्ज झाली आहे. कोरोनांचे नियम पाळणे गरजेचे असून मास्क व सोशल डिस्टन्स महत्वाचे आहे. संजय भोपी हे गेले दोन महिने कोरोनाशी झुंज देत होते. अखेर बुधवारी त्यांचे निधन झाले.