बालवयात अभिनय शिकला तर आदर्श नागरिक घडेल
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 13
ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : जीवनात यशस्वी होण्यासाठी अभिनय कला शिकलीच पाहिजे असे सांगत बालवयातच अभिनयाचे विविध पैलू अवगत केल्यास नक्कीच एक यशस्वी आणि आदर्श नागरिक घडण्यास मदत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर यांनी केले. संत शिरोमणी कला मंच आणि नवी मुंबई बालरंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित बाल नाट्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
दरम्यान, सदर बालनाट्य शिबिर 12 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत संपन्न होत आहे. सदर शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे हे गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने दिवाळी आणि उन्हाळी सुट्टांमध्ये अशा बाल नाट्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करत आहेत. या शिबिरात एकूण 40 उत्साही विद्यार्थी सहभागी झाले असून, मुले मजा-मस्ती करत दिवाळीच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत अभिनयाचे धडे गिरवत आहेत. रंगमंचावरील आत्मविश्वास, संवादफेक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा शिबिरांची बालवयात मोठी मदत होते. बालनाट्य शिबिराचा रंगतदार समारोप 22 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता विष्णूदास भावे नाट्यगृहात होणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात नाट्य शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचे विशेष नृत्य-नाट्य सादरीकरण देखील आकर्षण ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai