सिडकोच्या बिगर-ईडब्ल्यूएस घरांसाठी 27 नोव्हेंबरला सोडत
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 14
अर्ज मागे घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत
नवी मुंबई : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या प्रधानमंत्री आवास योजना 1.0 अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेतील बिगर-ईडब्ल्यूएस प्रवर्गातील सदनिकांची सोडत 27 नोव्हेंबर 2026 रोजी काढण्यात येणार आहे. यापूव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाची सोडत पार पडली असून, न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित असलेल्या उर्वरित सदनिकांच्या सोडतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या योजनेतील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची सोडत न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे स्थगित करण्यात आली होती. मात्र, या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर सिडकोने बिगर-ईडब्ल्यूएस प्रवर्गाची सोडत जाहीर केली आहे. तसेच योजनेतील मङ्खॠ’ या संज्ञेचा अर्थ बिगर-ईडब्ल्यूएस असा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अन्य अटी व शत पूवप्रमाणेच कायम राहणार आहेत.
दरम्यान, या योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या अर्जदारांना घोषणेच्या प्रसिद्धीपासून दहा दिवसांच्या आत अर्ज मागे घेण्याची किंवा सदनिकेवरील दावा सोडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी अर्जदारांनी आपल्या लॉगिनमधील ऑनलाइन सुविधेद्वारेच विनंती सादर करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही माध्यमातून आलेल्या विनंत्या स्वीकारल्या जाणार नाहीत. विशेष म्हणजे, अर्ज मागे घेणाऱ्या किंवा सदनिकेवरील दावा सोडणाऱ्या अर्जदारांची भरलेली बुकिंग रक्कम कोणतीही कपात न करता पूर्णपणे परत केली जाणार आहे. ऑनलाइन विनंती सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत ही रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल. मात्र, अर्ज नोंदणीवेळी दिलेले बँक खात्याचे तपशील अचूक व वैध असणे आवश्यक आहे. दहा दिवसांच्या मुदतीत अर्ज मागे न घेणाऱ्या अर्जदारांचा सोडतीतील सहभाग कायम राहणार असून, त्यांनी सिडकोने जाहीर केलेली प्रक्रिया मान्य केल्याचे गृहीत धरले जाईल. एकदा अर्ज मागे घेतल्यानंतर संबंधित अर्जदाराला सोडतीत सहभागी होता येणार नाही किंवा योजनेअंतर्गत फेरविचाराची मागणी करता येणार नाही, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai