250 औषध विक्रेत्यांचे लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 28, 2021
- 527
नवी मुंबई ः पालिकेच्यावतीने नागरिकांना घरापासून जवळच कोव्हीड लस घेता यावी याकरिता लसीकरण केंद्र संख्येत सातत्याने वाढ करण्यात आली असून सध्या 78 केंद्रे कार्यान्वित आहेत. लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी विविध घटकांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येते. आता मेडिकल स्टोअर्समध्ये कार्यरत असणार्यांसाठी औषध विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये 169 पुरूष व 81 महिला अशा एकूण 250 औषध विक्रेत्या कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणापासून कोणताही घटक वंचित राहू नये याची काळजी घेत 18 वर्षावरील कॉरी क्षेत्रात राहणारे कामगार तसेच बेघर निराधार व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येत आहे. विविध घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जात असताना ज्या व्यक्तींचा सेवा पुरविताना अनेक व्यक्तींशी नियमित संपर्क येतो अशा कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष लक्ष दिले जात आहे. आरोग्य साखळीतील मेडिकल स्टोअर्स हा एक महत्वाचा घटक आहे. तेथील कर्मचार्यांचा नागरिकांशी व त्यातही आजारी असलेल्या नागरिकांशी नियमित संपर्क येतो. त्यामुळे त्यांना कोव्हीड लसीचे संरक्षण मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये औषध विक्रेत्यांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणार्या 169 पुरूष व 81 महिला अशा एकूण 250 औषध विक्रेत्या कर्मचार्यांचे लसीकरण करण्यात आले.
आमच्या कोव्हीड काळातील कामाची दखल घेऊन विशेष लसीकरण सत्र आयोजित केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांतून आलेल्या मेडिकल स्टोअर्स कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले. या सत्रात जे लसीकरणासाठी येऊ शकले नाहीत अशा औषध विक्रेत्यांसाठी आणखी एकवार सत्र आयोजित करण्यात येणार आहे. यापुढील काळात अशाचप्रकारे हॉटेल/रेस्टॉरंट मध्ये काम करणारे कर्मचारी, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, स्विगी/झोमॅटो/कुरिअर सेवांमधील कर्मचारी, मार्केटमधील विक्रेते, घरोघरी दूध आदी सेवा पुरविणार्या व्यक्ती, टॅक्सी/रिक्षा चालक, सभागृहांमध्ये सेवाकार्य करणारे कर्मचारी अशाप्रकारे जनतेशी मोठ्या प्रमाणात संपर्क येणार्या व्यक्तींसाठीही महानगरपालिकेच्या वतीने विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येतील असे सूचित केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai