पनवेल मनपा आयुक्तपदी पुन्हा गणेश देशमुख
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 30, 2021
- 701
पनवेल ः पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एक वर्षापूर्वी गणेश देशमुख हे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अचानकपणे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती व त्यांच्या जागेवर सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता. शासनाकडून मंगळवारी (दि. 22) पुन्हा गणेश देशमुख यांची पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार पनवेल महानपालिका आयुक्त या पदावर प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात आली आहे, तर सुधाकर देशमुख यांना भिवंडी-निजामपूर महापालिकेचा कार्यभार देण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai