वयाच्या 22 व्या वर्षी निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण

ध्येयवेडा अभिनेता प्रसाद सोनावणेची  दमदार कामगिरी

छोट्या पडद्यावरील अभिनय क्षेत्रातील प्रसाद भालचंद्र सोनवणे या ध्येयवेड्या तरुणाने कमी वयात मोठी झेप घेतली आहे. लहान पासून अभिनयाची आवड असलेल्या प्रसादने नुकतेच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. प्रसाद लहानपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. छोट्या छोट्या अभिनयातून प्रसाद अभिनय क्षेत्रात पूर्णपणे परिपक्व होत गेला. प्रसादने कथा, कविता, गाणे असे लेखन क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे. अभिनयासोबतच प्रसादने कलर्स चित्रवाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या नाटकात त्याने सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. मात्र कोरोना काळात प्रसादने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले असून त्यात यश देखील मिळविले. 

वयाच्या बावीसाव्या वर्षी प्रसादने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. निर्मिती क्षेत्रातील ‘वेवो ना तू’ हे पंजाबी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याचे दिग्दर्शन वरुणराज मोरे, गायक म्हणून हनी सिंग राजपूत यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तर अंकिता अहुझा, सनी क्षत्रिय यांनीही काम केले आहे. वेवो ना तू हैं.. हे गाणे विवो या इंटरनॅशनल कंपनीसह संपूर्ण ऑडिओ प्लॅटफॉर्मला देखील प्रदर्शित झाले आहे. यात मेझॉन म्युझिक, स्पोटिफ, अँपल म्युझिक, आय टुन्स या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला देखील हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण चंदिगड आणि पंजाब या राज्यात करण्यात आले आहे. या गाण्याची रंगभूषा गीतांजली वानखेडे, व्यवस्थापन ज्ञानेश्वर राजकुळे यांनी केले. सहकलाकार म्हणून हर्षवर्धन सिंग राजपूत, शिवम, तेजस्विनी, तनवी, राहुल आदींनी काम केले आहे. दरम्यान, प्रसादचे निर्मिती क्षेत्रातील यश पाहता त्याच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.