मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण

पनवेल ः महानगरपालिकेने लादलेल्या जिझिया मालमत्ता कराविरोधात तसेच कळंबोली शहर आणि कळंबोली गावात न झालेल्या विकास कामांसंदर्भात सोमवारी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रविंद्र अनंत भगत बेमुदत उपोषणावर बसले आहे. 

पनवेल महानगरपालिका सिडको क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे विकासकाम न-करता नागरिकांवर जिझिया मालमत्ता कर सत्ताधार्‍यांच्या मदतीने लादलेले आहे. या विरोधात शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या माध्यमातून रहिवासीयांच्या बाजूने वारंवार आंदोलन करीत आहेत. वेगवेगळ्या प्रभागात मुक मोर्चा काढून या कराला विरोध दर्शविला जात आहे. मात्र तरीही पालिका आयुक्त कर भरावाच लागेल यावर ठाम असल्याने नागरिकांत अधिक अंसतोष पसरला आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांनी बेमुदत उपोषण सुरु आहे. आमदार बाळाराम पाटील साहेब व नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब यांच्या समवेत उपोषण स्थळी जाऊन नगरसेवक रविंद्र भगत यांची भेट घेऊन पाठींबा दिला. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेस नेते सुदाम पाटील, समाजवादी पक्षाचे अनिल नाईक, नगरसेवक शंकर म्हात्रे, गोपाळ भगत,सतीश पाटील, विजय खानावकर, शिवसेना नेते कृष्णा कदम, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, प्रज्योती म्हात्रे, सारिका भगत, प्रिया भोईर, युवा नेते प्रकाश म्हात्रे,जॉनी जॉर्ज, किरण दाभने, श्री.विजय भोईर, विजय पाटील, सुभाष पाटील, महिला आघाडीच्या सरस्वती काथारा, स्वाती रौधंळ तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होते.