हिमाचलच्या ‘सिमरन’ ची नवी मुंबईत चलती
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 28, 2021
- 696
नवी मुंबई : हंगामी फळांना मागणी असल्याने त्यांची आयात होताच ती खरेदीसाठी खवय्यांची गर्दी होते. सध्या एपीएमसीत फळ बाजारात हिमाचलच्या ‘सिमरन’ फळाची आवक सुरु झाली आहे. ग्राहकांना सिमरन फळाचे खास आकर्षण असल्याने खरेदीसाठी फळ बाजारात गर्दी पहायला मिळत आहे.
उत्तरप्रदेशातील पावसाळी आंबे संपल्यावर फळ बाजारात सिमरन फळाचा हंगाम सुरु होतो. या फळाचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. हे फळ दिसायला साधारणतः टोमॅटोसारखे असून चवीला गोड असल्याने खरेदीसाठी खवय्यांची चांगलीच गर्दी होत आहे. हे फळ सुरवातीला हिरवळ आणि पिवळसर असते. पिकल्यावर ते लाल रंगाचे होते. हे फळ शिमला येथून येत असल्याने त्याला सिमरन म्हणून ओळखले जाते. शिवाय, या फळात जवळपास अनेक जीवनसत्व असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी या फळाला लोक पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र, काही मोजक्या व्यापार्यांकडे या फळाची आवक होेत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून हे फळ येत असून मुंबई एपीएमसी बाजारात साधारण 1 ते 2 हजार बॉक्सची आवक होत आहे. या फळाचा एक बॉक्स अंदाजे बारा ते चौदा किलोचा असतो. घाऊक बाजारात त्याच्या एका पेटीला दर्जानुसार 1200 ते 1800 रुपये भाव मिळत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai