स्वच्छता स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2021
- 553
नवी मुंबई ः स्वच्छता विषयक उत्तम कामगिरी करणार्या संस्थांच्या कामाचे कौतुक व्हावे व त्यांना यामधून प्रोत्साहन आणि इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी याकरिता स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट, शासकीय कार्यालय या सहा गटांतील स्वच्छता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करीत उत्साहात संपन्न झाला.
सहा गटांमध्ये आयोजित या स्वच्छता स्पर्धेमध्ये एकूण 35 गृहनिर्माण संस्था/वसाहती, 35 हॉटेल्स, 37 महापालिका शाळा, 34 खाजगी शाळा, 16 मार्केट्स, 30 शासकीय कार्यालये आणि 32 रूग्णालये सहभागी झाली होती. यामध्ये गुणांकन करताना प्रामुख्याने निर्मितीच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण, कचर्यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्थापन, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा आणि कोव्हीड-19 आजाराचा प्रसार रोखण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन अशी विविध निकषांचा विचार करण्यात आला. या निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात येऊन आठही विभाग स्तरावर स्वतंत्र 3 पारितोषिके वितरित करण्यात आली तसेच संपूर्ण महापालिका क्षेत्र स्तरासाठी स्वतंत्र 3 पारितोषिके वितरित करण्यात आली. स्वच्छतेत चांगली कामगिरी करणार्या काही सोसायट्यांना विभागीय स्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
स्वच्छ सोसायटी
1. कोकण रेल विहार, सीवूड्स
2. सिध्दीविनायक टॉवर सेक्टर 5 कोपरखैरण
3. निलसिध्दी अटलांटिस सेक्टर 19 ए कोपरखैरणे
‘स्वच्छ हॉटेल’
1. फॉर्च्युन सिलेक्ट एक्झोटिका हॉटेल, सेक्टर 19 डी तुर्भे
2, महापे येथील रामाडा हॉटेल
3. हॉटेल फोर पॉईंट, सेक्टर 30 ए वाशी
‘स्वच्छ शाळा (महापालिका स्तर)’
1. राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55, रबाळे
2. श्री दत्त विद्यामंदीर शाळा क्र. 116, सेक्टर 5, सानपाडा
3. माध्यमिक शाळा क्र. 103, सेक्टर 14, ऐरोली
‘स्वच्छ शाळा (खाजगी)’ गटात
1. रा.फ.नाईक विद्यालय, सेक्टर 8, कोपरखैरणे
2. अँकरवाला स्कुल. सेक्टर 14 वाशी
3. टिळक इन्टरनॅशनल स्कुल, घणसोली
‘स्वच्छ मार्केट’ स्पर्धेत
1. श्रमिक जनता फेरीवाला मार्केट, सेक्टर 8 कोपरखैरणे
2. राजीव गांधी क्रीडा संकुलाजवळील मार्केट, सेक्टर 3 ए, बेलापूर
3. महाराजा मार्केट, सेक्टर 17 वाशी
‘स्वच्छ रूग्णालय’
1.अपोलो हॉस्पिटल, सेक्टर 23 बेलापूर
2. एमपीसीटी रूग्णालय, सेक्टर 4
3. साई स्नेहदीप रूग्णालय, सेक्टर 19
‘शासकीय कार्यालय’
1.अधिक्षक केंद्रीय सीमाशुल्क निवारक कार्यालय, सेक्टर 15 ए बेलापूर
2. सागरी व किनारी जैव विविधता केंद्र, सेक्टर 10 ऐरोली
3. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय, सेक्टर 16 ए वाशी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai