भर दिवाळीत असा रंगला चीनी मालवरील बहिष्कार!
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 02, 2021
- 637
मुंबईः भारत आणि चीन यांच्यातल्या तणावाचा परिणाम दोन्ही देशांच्या आयात-निर्यातीवर होत नसल्याची आकडेवारी एकीकडे जाहीर झाली असताना दुसरीकडे मात्र भारतातल्या काही व्यापारी संघटनांनीच चिनी मालाच्या विक्रीवर बहिष्कार टाकल्याने तसंच ग्राहकांनीही त्याला प्रतिसाद दिल्याने चीनला पन्नास हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या भारतातल्या अग्रगण्य व्यापार संस्थेने सांगितलं की बहिष्काराच्या आवाहनामुळे चिनी उत्पादनावर व्यापक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. या संस्थेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ट्वीट केलं आहे की गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही सीएआयटी इंडियाने चिनी वस्तूंवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाचा व्यापक परिणाम होईल. देशातल्या व्यापारी आणि आयातदारांनी चीनमधून आयात बंद केल्यामुळे या सणासुदीत चीनला सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
सीएआयटी लोकांना चिनी वस्तूंविरोधात जागरुक करत आहे. या संघटनेने गेल्या वर्षीही ही मोहीम राबवली होती. सीएआयटीने सांगितलं की, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही सीएआयटीने लोकांना केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचंच नव्हे तर देशातल्या व्यावसायिकांनाही चिनी उत्पादनांची आयात न करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे देशातल्या व्यापारी आणि आयातदारांनी चीनमधून आयात करणं बंद केलं आहे. परिणामी, दिवाळीमध्ये चीनी विक्रेत्यांना मोठा फटका बसणार आहे.
खंडेलवाल यांनी यासंदर्भात सांगितलं की संस्थेच्या संशोधन शाखेने या मोहिमेसंदर्भात नुकतंच 20 प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केलं होतं. सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय व्यापारी किंवा आयातदारांनी दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा चिनी निर्यातदारांना कोणत्याही मोठ्या ऑर्डर दिल्या नाहीत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, या सर्वेक्षणात नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, चंदीगड, रायपूर, नागपूर, जयपूर, भुवनेश्वर, अहमदाबाद, रांची, गुवाहाटी, पाटणा, भोपाळ, जम्मू, बंगळुरु, हैदराबाद, मदुराई आणि पुद्दुचेरीचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai