11 वर्षीय पुतणीवर तडीपार काकाचा अत्याचार
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 17, 2021
- 654
खारघर : खारघरमध्ये एका 11 वर्षीय मुलीवर चुलत्याने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. फरीद खलील शेख असे आरोपीचे नाव आहे. फरीद हा तडीपार गुन्हेगार आहे. या कालावधीत त्याने हा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खारघर पोलिसांनी त्याला अटक केली.
ओवे परिसरातील एका गावात ही घटना घडली. एकाच इमारतीत पीडितेचे कुटुंब आणि तिचा चुलता वास्तव्यास आहे. पीडितेचे वडील हे एका गुन्ह्यात दोषी सिद्ध झाल्याने शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, पीडितेची आई कामात असल्याचे पाहून फरीदने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी खारघर पोलिस तपास करीत आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेखवर काही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तडीपार घोषित करण्यात आले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai