तुळशी विवाह निमित्ताने औषधी वनस्पतींचे प्रदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2021
- 609
नवी मुंबई ः सानपाडा विवेकानंद संकुल येथे 18 नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह कार्यक्रम आनंदात पार पडला. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत अनेक ‘औषधी वनस्पतींचे प्रदर्शन’ साकारण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये आपल्या परिसरात आढळणार्या व औषधी गुणधर्म असणार्या वनस्पती व त्यांचे सविस्तर माहिती वनस्पतीप्रेमी आबा रणावरे यांनी शिक्षकांना दिली.
सदर प्रदर्शनात इन्सुलिन, तुळस, कोरफड, आघाडा, सदाफुली, अडुळसा, ओवा, पानफुटी, गवती चहा इत्यादी वनस्पतींचा समावेश होता. पूर्वापार चालत आलेला आजीबाईचा वारसा नव्या पिढीला मिळावा त्या वारसाचे जतन केले जावे यासाठी भावी पिढी घडवणार्या शिक्षकांना त्याची माहिती असणे गरजेचे आहे. त्यानिमित्ताने हा सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपले पर्यावरण व आपले आरोग्य याचा असणारा निकटचा संबंध कळणे हा या मागचा उद्देश होता. या सर्व वनस्पती अल्पमोली बहुगुणी अशा प्रकारच्या आहेत. सदर कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य मोहन ढवळीकर ठाणे जनता सहकारी बँक व्यवस्थापिका बंदरकर, वनस्पती प्रेमी हा बाबा रणावरे, शाळेच्या मुख्यध्यापिका देशपांडे मॅडम व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai