भाजी विक्रीसोबत गांजाची विक्री
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2021
- 763
महिलेला अटक ; 834 ग्रॅम गांजा जप्त
नवी मुंबई : भाजीपाला विक्री करण्याबरोबरच छुप्या पद्धतीने गांजाची विक्री करणार्या एका महिलेला मध्यवर्ती गुन्हे शाखेने उलवे येथून अटक केली आहे. गुन्हे शाखेने सदर महिले जवळ असलेला 834 ग्राम वजनाचा 16 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
नशा मुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव व गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्तं महेश घुर्ये यांनी कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या कारवाया सुरू असतानाच, उलवे सेक्टर-19 मध्ये भाजीपाला विक्री करणारी एक महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गत मंगळवारी उलवे सेक्टर -19 मध्ये सापळा लावला होता. यावेळी त्या भागात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारी महिला मंजुळा माणिक रुडे हि छुप्या पद्धतीने गांजा विक्री करताना आढळून आली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्या जवळ 834 ग्राम गांजा सापडला. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा गांजा जप्त करून सदर महिले विरुद्ध एनआरआय पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर गुन्हयाचा पुढील तपास अमली पदार्थ विरोधी कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai