कंत्राटी कामगारांच्या समस्या 15 दिवसात सोडवा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2021
- 731
मनसे कामगार युनियनचे पालिका आयुक्तांना निवेदन
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मधील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कामगारांच्या प्रलंबित समस्या 15 दिवसांच्या आत सोडविल्या नाही तर आंदोलन करण्याच्या इशारा मनसे पालिका युनियनच्यावतीने देण्यात आला.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना दरम्यान कार्यालयात उपस्थितीत असलेल्या कामगारांना 60 दिवसांचा कोरोना भत्ता प्रती दिन 300 याप्रमाणे आयुक्ताने मंजूर करुन देखील अद्यापही कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही, तो त्वरित कामगारांच्या खात्यात जमा करण्यात यावा. तसेच 28 जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील क आणि ड वर्ग महापालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदा यामधील कोव्हीड काळात कर्तव्य पार पाडताना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचार्यास 50 लाख विमा कवच देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी 5 महिने झाले तरी महापालिकेमार्फत अद्याप झालेली नाही. त्यामुळे 15 दिवसाच्या आत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनातून केली. महाराष्ट्रातील विविध महापालिकांमध्ये जी कामे कंत्राटी स्वरुपावर केली जातात, तीच कामे इतर महापालिकांमध्ये कायम स्वरुपी कामगारांकडूनही केली जातात. कायम स्वरुपी कामगारांना वेतन आयोगाप्रमाणे नमूद केल्यानुसार श्रेणीनुसार वेतन आणि भत्ते मिळतात, उलटअर्थी कंत्राटी कामगारांना फक्त किमान वेतन दिले जाते. एकाच कामासाठी कायम स्वरुपी कामगारांना आणि कंत्राटी कामगारांना वेगवेगळे वेतन देवून दुजाभाव केला जातो. त्याचबरोबर समान काम समान वेतन करिता नेमण्यात आलेल्या समिती मध्ये प्रशासकीय अधिकार्यांव्यतिरिक्त कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा देखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह कामगार सेना अध्यक्ष राजेश उज्जैनकर, अमोल आयवळे, अभिजित देसाई, रणजीत सुतार, महेंद्र म्हात्रे, रमेश पर्हाड, सुयश पाटील, अरविंद बोंबले, सुनील राठोड, विजय राठोड, देविदास भोईर, सदानंद काकडे, आदिंचा समावेश होता. दरम्यान, सदर सर्व मागण्यांची 15 दिवसांच्या आत पूर्तता न झाल्यास नवी मुंबई महापालिकेतील सर्व विभागातील कामगार त्यांच्या न्याय हक्कासाठी कामगार कायद्यातील तरतुदीप्रमाणे आंदोलन करतील, असा इशारा मनसे महापालिका युनियनच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai