इंग्रजी शाळेसाठी पालिकेचा प्रस्ताव
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 09, 2022
- 626
पनवेल : खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे पालिका शोतील विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. आता पालिकेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
पनवेल महापालिकेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पालिका क्षेत्रात जनता दरबार भरवला होता. या वेळी पनवेल पालिकेच्या शाळा इंग्रजी माध्यमातून सुरू कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्याने त्याची अंमलबजावणी प्रशासन करणार आहे. पालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. सध्या पनवेल महापालिकेच्या 11 शाळा आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या आठ शाळा असून, उर्दू माध्यमाच्या दोन, तर गुजराती माध्यमाची एक शाळा आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार, पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंतचे वर्ग इंग्रजी माध्यमाचे सुरू केले जाणार आहेत. पालिकेच्या निर्णयाचा फायदा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची इच्छा असूनही फी परवडत नसलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. इंग्रजी शाळा चालवण्याचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार आहे. मात्र, ही शाळा सुरू करण्यासाठी सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai