सराईत गुन्हेगार गजाआड
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2022
- 1085
पनवेल ः पनवेलसह रायगडमध्ये घरफोड्यांसह मोटार सायकल चोरी करणार्या एका गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून घरफोडीबरोबर एक चोरीची मोटार सायकल हस्तगत केली आहे.
शहरातील अक्षय फुट वेअर या गोडावूनमध्ये स्लायडींगच्या खिडकीची काच उघडून आरोपी हैदर अजीज पठाण (24 रा.शिवकर) व त्याचा एक साथीदार हे आतमध्ये घुसून त्यांनी ड्राव्हरमध्ये ठेवलेली 1 लाख 2 हजार रुपये रोख रक्कम घेवून ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि विजय कादबाने व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे, पो.हवा.रवींद्र राऊत, परेश म्हात्रे, विनोद देशमुख, महेंद्र वायकर, पो.शि.विवेक पारासूर, प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सदर गुन्हा उघडकीस आला आहे. त्याचप्रमाणे त्याने आतापर्यंत रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व मोटार सायकल चोरीचे 20 गुन्हे केले आहेत. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai