महाराष्ट्र भवनसाठी 100 कोटींची तरतूद
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 11, 2022
- 694
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री पवार यांची घोषणा
मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. यावेळी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनसाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे 21 वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र भवन उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी मुंबई शहरात इतर 18 राज्यांची भवन उभारण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्र भवन अजूनही प्रलंबित असल्याने महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून मुंबईत कामासाठी येणार्या नागरिकांची गैरसोय होते. वाशी रेल्वे स्थानकासमोरील सेक्टर 30 परिसरात सिडको प्रदर्शन केंद्राजवळ आठ हजार चौरस मीटरचा भुखंड या भवनासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. राज्याच्या अर्थ विभागाने या बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा अशी सिडकोची अपेक्षा आहे. त्यामुळे गेली 21 वर्ष तिथे एकही विट रचली गेली नाही. या भवनसाठी आ. मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला आहे. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसते. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणार्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. याकरिता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आ. मंदा म्हात्रे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नवी मुंबईतील प्रस्तावित महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांना मनपुर्वक धन्यवाद देते. नवी मुंबईतही इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सदन डौलाने उभे राहिल. - आ. मंदा म्हात्रे
- एमपीएससीसाठी स्वतंत्र कार्यालय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामाकाजाकरीता स्वतंत्र भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे स्वतंत्र भवनासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज मुंबईतील एका भाड्याच्या जागी चालत आहे. त्यावर आता स्वतंत्र कार्यालयाची तरतूद करण्यात आली आहे. - गुढी पाढव्याला मराठी भाषा भवनचे भूमीपूजन
मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी मुंबईत 100 कोटी रुपये खर्चाचे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. येत्या 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या भवनाचे भूमीपूजन करण्याचे नियोजन आहे. तसेच, नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषा संशोधन उपकेंद्रासाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली.
इतर महत्त्वाच्या घोषणा
- कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद
- आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद
- मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद
- पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी तरतुद
- उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद.
- मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
- हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील.
- तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
- आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद.
- अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार.
- एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत
- महिला शेतकर्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केली आहे.
- कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai