मशिदीचे बांधकाम सुरू झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 13, 2022
- 545
अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानची भूमिका
नवी मुंबई ः महानगरपालिका व सिडको प्रशासनाने जर जनभावनेविरुद्ध अन्यायकारक भूमिका घेऊन सदर भूखंडाच्या जागेवर मशिदीचे बांधकाम सुरू केले तर अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सामूहिक आत्मदहन आंदोलन करतील, असा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास ताजणे यांनी राज्य सरकार व प्रशासनाला दिला.
अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने 13 एप्रिल 2022 रोजी नवी मुंबई सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती, याप्रसंगी बोलताना कैलास ताजणे बोलत होते. त्यांनी सांगितले की, संस्था कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. सुरुवातीला येथील धार्मिक स्थळे बघूनच लोकांनी घरे घेतली. मात्र स्थानिक रहिवाश्यांनी आंदोलन करून मशिदीच्या भूखंडाला विरोध केला होता. तरी देखील 17 नोव्हेंबर 2014 ला सिडकोने सानपाडा येथील सेक्टर 8 मधील प्रेससाठी राखीव असलेला भूखंड मशिदीसाठी दिला. सानपाडामध्ये 50 हजार लोकसंख्या असून 110 मुस्लिम कुटुंब आहेत. त्यामुळे लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन मशिदीला प्रशासनाने पर्यायी जागा द्यावी, अशी स्थानिक राहिवाश्यांची मागणी आहे. मशीद हटविण्याच्या मागणीला सानपाडा येथील सर्व पक्षांचा, सामाजिक संस्थांचा व 65 गृहनिर्माण सहकारी सोसायटीचा पाठिंबा आहे. नुकतेच मशिदीविरोधात लाक्षणिक उपोषण झाले असून, त्यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी येऊन जागेची पाहणी केली असून ते आपला अहवाल सरकारला सादर करणार आहेत. प्रतिष्ठानचे सचिव घनश्याम पाटे यांनी सांगितले की, 1998 पासून मशिदीसाठी जागा मागण्यास सुरवात केली, तेव्हापासून स्थानिक राहिवाश्यांचा मशिदीला भूखंड देण्यास विरोध असून त्यांनी रास्ता रोको, मोर्चा यासारखी अनेक आंदोलने केली. लोकसंख्येनुसार प्रार्थना स्थळे असावी, अशी आमची मागणी आहे. याप्रसंगी पत्रकार परिषदेला भाजपाचे जगन्नाथ जगताप, भाऊ भापकर, सुनील कुरकुटे,शिवसेनेचे नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, राष्ट्रवादीच्या नगरसेवक संगीता बोर्हाडे, माजी राज्यमंत्री संजीव उपाध्याय, मनसेचे शेट्ये, मंदाकिनी कुंजीर, राजेश ठाकूर,विसाजी लोके,विकास वाघुले आदी सामाजिक व सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai