363 कोटींचे हेरॉइन जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 15, 2022
- 820
नवी मुंबई : दुबई येथून कंटेनर मधून आलेले 363 कोटी रूपयांचे हेरॅाईन नवी मुंबंई पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहे. सदर कंटेनर 27 डिसेंबर 2021 रोजी दुबई वरून जेएनपीटी बंदरात आला होता. बाजारात तब्बल 363 कोटी रुपय किंमत असलेले हे 73 किलो ग्रॅम वजनाचे आहे.
डिसेंबरमध्ये हा कंटेनर दुबईहून आला होता. आजिवली हद्दीतील नवकार लॉजिस्टिकमधील या कंटेनरवर गेल्या सहा महिन्यांच्या काळात कोणीही मालकी सांगितली नव्हती. सदर प्रकरणी संशय आल्याने पंचासमक्ष हे कंटेनर उघडण्यात आले दरम्यान यात मार्बल सापडलं होतं. मात्र या कंटेनरच्या दरवाजामध्ये 73 किलो हेरॉईन सापडलं आहे. (पान 7 वर)
पंजाब पोलीसांच्या मदतीने नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये हेरॉईन नामक अंमलीपदार्थ 72.518 कि.ग्रॅ. वजनाचे व सुमारे 362.59 कोटी रुपये किंमतीचे एकुण 168 पॅकेट्स मिळुन आले. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ (हेरॉईन) संगनमत करून अवैधरित्या भारतात आयात करणारे, निर्यात करणारे, प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मदत करणार्या इसांमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai