शाळेची फि न भरल्याने विद्यार्थ्यांना बसविले वर्गाबाहेर
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2022
- 574
उरण ः शाळेची फी भरली नसल्याने शिक्षण घेणार्या शाळेतील विद्यार्थ्याना अपमानास्पद वागणूक देत तासनतास वर्गाबाहेर ताटकळत ठेवण्याचा निंदनीय प्रकार उरणमध्ये घडला आहे. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
बोरी येथील यूईएस शाळेत विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली नसल्याने वर्गासमोर तासनतास ताटकळत ठेवल्याची धक्कादाय घटना घडली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थी सकाळी 7 वाजता शाळेत गेले होते. मात्र फी न भरल्याने 6 व ते 10 वीच्या 18 विद्यार्थ्यांना वर्गात न घेता वगाबाहेर वसविण्यात आले. फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना चार तास बाहेर उभे केले. संदेश पाठवीत फोन करून पालकांनाही बोलावून घेतले. पालक-विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या काही पदाधिकारी आणि सदस्यांनी थेट शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनालाच जाब विचारला. यामुळे पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते जयंत गांगण यांनी यूईएस शाळा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांच्या कानावर फोन करून ही बाब टाकली असता लगेच ते शाळेत हजर झाले. मिलिंद पाडगावकर यांनी घडलेला सर्व प्रकार समजून घेउन पालकांची प्रत्यक्ष समस्या समजून घेउन सदर घटना निंदनीय असून अशी घटना पुन्हा होणार नसल्याची कबूली पालकांना दिली. थकित फी बाबत निश्चितपणे सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पालक संघटना, व्यवस्थापन यांची बैठक घेतली जाईल असेही पाडगावकर यांनी सांगितले. शिक्षक व प्राचार्यांकडून समाधानकारक उत्तर पालकांना मिळत नाही. फी संदर्भात अशा घटना वारंवार होत असून पुन्हा असे होउ नये यासाठी गट शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री यांनी या संबंधित शिक्षक व प्राचार्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली. .......................................................
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai