हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मूळगावी परतणार
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2022
- 710
उरण ः शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. वर्षानुवर्षे शासनाने ही महत्वाची समस्या तशीच प्रलंबित ठेवल्याने या ग्रामस्थांचा जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. पुनर्वसन न झाल्याने शासनाचा निषेध करत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ कायम स्वरूपी आपल्या मूळ गावी शेवा कोळीवाडा गावात राहायला जाणार आहेत. तसा ग्रामसभेत ठराव सुद्धा पारीत करण्यात आला आहे.
जेएनपीटीच्या प्रकल्पासाठी शेवा कोळीवाडा गावातील जमीन संपादन करण्यात आली होती. त्याबद्दल्यात ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे व इतर सेवा सुविधा पुरविण्याचे जेएनपीटी प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. त्या आश्वासानांची वर्षानुवर्षे पूर्तता होत नसल्याने हा विषय चिघळला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा विषय त्वरित सोडवावा अशी मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांसह उरण मधील विविध सामाजिक संघटनानी प्रशासनाकडे केली आहे. जेएपीटीने दुसर्या टप्प्यासाठी शेवा कोळीवाडा गावठाण लागणार आहे हे खोटे कारण सांगून सरकारकडे शेवा कोळीवाडा गावठाण मागितले होते. गेल्या 37 वर्षात शेवा कोळीवाडा गावठाण जेएनपीटीला लागले नाही आणि भविष्यात लागणार नाही. असे असताना सरकारने जेएपीटीवर विश्वास ठेवला होता. सरकारला जेएपीटीने शेवा कोळीवाडा गावाचे पुनर्वसनाची खर्चाची हमीची जबाबदारी सरकारला 12 नोव्हेंबर 1982 रोजी दिली होती. ती गेल्या 37 वर्षात कागदावरच आहे.
सरकारच्या सन 1984 च्या जनगणनेनुसार शेवा कोळीवाडा गावातील 86 शेतकरी व 170 बिगर शेतकरी अशा एकूण 256 कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे जाहीर केले होते. त्यांचे बोरीपाखाडी उरण येथे 17 हेक्टर जमिनीत शासनाचे माप दंडानंदाने पुनर्वसन करण्याचे 1985 ला मंजूर होते. पण जेएपीटीने फंड न दिल्याने आजतागायत 37 वर्षे झाले तरी पुनर्वसन झालेले नाही. सरकारने या 256 कुटुंबांना बोरीपाखाडी उरण येथील 17 हेक्टर जमिनी पैकी फक्त 91 गुंठे जमिनीत संक्रमण शिबिरात ठेवलेले आहे. रोजीरोटीसाठी पर्यायी संपदा (नोकरी) दिलेली नाही. जेएपीटीने शेवा कोळीवाडा गावातील लोकांच्या जमिनी, घरे सर्व हिरावून घेऊन ही शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करत नसल्याने आणि जेएपीटीकडुन होत असलेला मानवी हक्कांचा छळ असह्य झाला आहे. परिणामी हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) गावातील ग्रामस्थांनी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या 11 जुलै 2017 रोजीच्या आदेशानुसार ग्रामसभेत मूळ शेवा कोळीवाडा गावात कायमस्वरूपी रहायला जाण्याचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai