भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्समध्ये चोरी
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 20, 2022
- 737
पनवेल ः कामोठे वसाहतीमध्ये रविवारी मध्यरात्री भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची घटना घडली. सेक्टर 11 येथील वसंतबहार सोसायटीतील लक्ष्मी ज्वेलर्समधील तिजोरी गँस कटरच्या साह्याने तोडून 15 किलोग्रॅम चांदीचे दागिने लुटले.
चोरट्याने भिंतीला भगदाड पाडल्यावर तेथे मद्यपान केले. त्यानंतर प्राणवायू व गँस कटरच्या साह्याने तिजोरी कापून चोरी केली. लक्ष्मी ज्वेलर्स सराफ दूकानाचे 39 वर्षीय मालक सूरेश कुमावत यांच्या दूकानालगत असणार्या दूकानाची भिंत फोडून कुमावत यांच्या दुकानात प्रवेश केला. तर दुसरीकडे कामोठे वसाहतीमधील सेक्टर 36 येथील आईमाता मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि मंदीरामधील सीसीटिव्ही कॅमेरे चोरला गेल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. दोनही घटनांमुळे कामोठे वसाहतीमधील व्यवसायिकांसह भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी खारघरमधील मंदिरात सुद्धा चोरट्यांनी दानपेटी फोडली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai