दिव्यांगत्वाविषयी वॉकेथॉनव्दारे जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 05, 2022
- 553
नवी मुंबई ः जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या वतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये 400 हून अधिक दिव्यांग मुले, त्यांचे पालक व दिव्यांग व्यक्तींनी सहभागी होत दिव्यांगत्वाविषयी तसेच स्वच्छता आणि सर्व शिक्षा अभियानाविषयी जनजागृती केली.
अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहानुभूती दाखविण्यापेक्षा कृतीतून आपुलकी प्रदर्शित करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत ज्या उत्साहाने वॉकेथॉनमध्ये दिव्यांगांनी सहभागी होत आत्मशक्तीचे दर्शन घडविले ती प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त केले. क्रिकेटपटू चंद्रशेखर, नृत्यांगना सुधा चंद्रन अशी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून स्वबळावर पुढे आलेल्या व्यक्तींची उदाहरण देत नवी मुंबईतून अशी लौकिकप्राप्त व्यक्तिमत्वे घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी पालिकेचे इटीसी केंद्र देशापरदेशात नावलौकिकप्राप्त असल्याचे सांगत यापुढील काळातही दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे सूचित केले. इडियन पेडियाट्रिक असो. नवी मुंबई अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे यांनी शारीरिक कमतरतेमुळे कुणी व्यक्ती सामाजिक प्रवाहात मागे राहता कामा नये हे आपले ध्येय असून 2030 पर्यंत ते साध्य करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने नवनवीन संकल्पनांचा वापर करणे गरजेचे असून या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका इटीसी केंद्राच्या माध्यमातून आघाडीवर आहे, शिवाय नवजात अर्भकांच्या सुदृढतेच्या दृष्टीने आवश्यक स्क्रिनींगमध्येही नमुंमपा आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे ही प्रशंसा करण्यासारखी बाब असल्याचे सांगितले.
यापूर्वी प्रचलित 6 प्रकारच्या दिव्यांगत्वामध्ये आता आणखी प्रकार समाविष्ट करीत लोकोमोटर दिव्यांगत्व, कुष्ठरोग निवारणपश्चात, सेरेब्रल पाल्सी, शारीरिक वाढ कुंठीतता, स्नायूविकृती, सीड टेक ग्रासीत व्यक्ती, दृष्टीदोष, अंधत्व, अंशत: अंधत्व, कर्णबधिरत्व, वाचिक व भाषिक दिव्यांगत्व, बौध्दीक अक्षमता, विशिष्ट अध्ययन अक्षमता, स्वमग्नता, मानसिक वर्तनविषयक आजार, बहुविध दृधन, पार्किसन्स, हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, बहुविकलांगता असे दिव्यांगत्वाचे 21 प्रकार असल्याबाबतची जनजागृती वॉकेथॉनच्या माध्यमातून करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai