‘पार्टी’चा धम्माल ट्रेलर लॉच
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 21, 2018
- 878
‘मैत्रीसाठी काहीही...’ असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात ! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेली हि सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. अश्या या सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या ‘पार्टी’चा नुकताच लोअर परेल येथे रंगतदार ट्रेलर लाँँच करण्यात आला. धम्माल पार्टी मूडने उपस्थितांना खुश करून टाकणार्या या कार्यक्रमात, ‘पार्टी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थिती लावली होती.
मैत्रीचा हँँगओव्हर चढवणार्या या ट्रेलरमध्ये सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर या चार मित्रांची धम्माल-मस्ती आणि त्यांची लव्हस्टोरी आपणास पाहायला मिळते. पण त्यासोबतच कालांतराने विभक्त झालेल्या या चौकडींचे दुखणंदेखील यात दिसून येते. तसेच, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपालादेखील यात दिसून येत आहेत. हा सिनेमा, महाराष्ट्रातील तमाम मित्रांचे नाते आणखीन घनिष्ट करण्यासाठी येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai