घरफोडी करणारे दोन सर्हाईत अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2022
- 696
8.50 लाखांचा ऐेवज जप्त
नवी मुंबई ः मूळचे उत्तरप्रदेशमधील दोन मित्र नशीब आजमावण्यास मुंबईत आले. मात्र त्यांनी कष्ट करण्यापेक्षा पैसा कमावण्यास शार्टकटचा अवलंब केला. एक घरफोडी यशस्वी झाल्यानंतर ते त्यात माहीर झाले. यासाठी ते पुणे नवी मुंबई आणि मुंबईत येत होते. मात्र नेरूळ पोलिसांच्या सतर्कतेने त्यांना अटक करण्यात यश आले.
सौरभ देवशरण यादव (वय 24 वर्षे), तौफिक हावसी शेख (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कायम पत्ता बदलणार्या आरोपींनी सध्या मीरा भाईंदर येथे मुक्काम ठोकला होता. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीचा तपास करीत असताना काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे दोन्ही आरोपी आले होते. त्यांचे फोटो खबर्यांना देण्यात आले. या प्रयत्नांना यश आले व हे दोन्ही आरोपी शिरवणे येथे असल्याचे समोर आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडी करण्याचे साहित्य आढळले. त्यांना पोलिसी हिसका दखवत चौकशी केली असता नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतच त्यांनी गेल्या काही महिन्यापासून सहा घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी सांगितलेल्या घरफोडीची शहानिशा केली असता या सहाही घरफोडी बाबत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. नेरूळ येथील गुन्ह्यातील त्यांच्याकडून अंदाजे 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 8 लाख रुपयांचे दागिने व 50 हजारांचा टॅब असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर अटक आरोपी हे सराईत घरफोडी करणारे आहेत. नेरूळ पोलीस ठाणेकडे दाखल गुन्हयांचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai