भारतातच मिळणार परदेशी शिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 07, 2023
- 474
परदेशातील विद्यापीठांना कॅम्पससाठी यूजीसीची मान्यता
मुंबई : मागील काही वर्षात अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. आता या परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली असून त्या संदर्भातील नियमावली जारी केली आहे. परदेशातील विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्था भारतात आपले कॅम्पस सुरू करू शकते. त्यासाठी दहा वर्षांची मंजुरी यूजीसीकडून दिली जाणार आहे.
काही अटी-शर्तींवर परदेशातील विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरु करण्यासाठी यूजीसीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आत भारतात राहूनही परदेशी शिक्षण मिळणार आहे. यामध्ये परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस जेव्हा भारतात सुरू होतील तेव्हा त्यांना ऑनलाईन किंवा दुरस्थ अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, म्हणजे प्रत्यक्ष शिक्षण या परदेशातील विद्यापीठांना भारतात द्यावे लागेल. जेव्हा परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू होतील तेव्हा त्यांना प्रवेश प्रक्रिया राबवणे, त्यासोबतच विविध अभ्यासक्रमांचे शुल्क आकारणे यामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जाईल. मात्र, परदेशातील अभ्यासक्रम शिकवताना उत्तम दर्जाचे शिक्षण भारतातील विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे, यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे अशा सूचना यूजीसीकडून देण्यात आल्या आहेत.
परदेशी विद्यापीठांना दोन वर्षांत भारतात कॅम्पस सुरू करावे लागतील. आयोगाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत कॅम्पस कार्यान्वित होणे आवश्यक आहे. परदेशी विद्यापीठांना यूजीसीच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. परदेशातील विद्यापीठातील कॅम्पसमध्ये प्रवेश घेतामात्र परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू करताना तशा प्रकारची वातावरण निर्मिती, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग ,करिअरच्या उत्तम संधी, सोई सुविधा आणि प्लेसमेंट याचा सुद्धा विचार प्रवेश घेताना विद्यार्थी आणि पालक करतील. त्यामुळे परदेशातील विद्यापीठांच्या दर्जाच शिक्षण या कॅम्पसमध्ये मिळावं अशी अपेक्षा या निर्णयानंतर असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai