खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


उत्तरप्रदेशात हत्या करून नवी मुंबईत पसार

नवी मुंबई गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक 

नवी मुंबई ः उत्तरप्रदेश येथील प्रतापगढमध्ये आपसी वादातून एका व्यक्तीची हत्या करून चार आरोपी पळून गेले होते. हे चार आरोपी नवी मुंबईतील खारघर येथे लपून बसल्याची माहिती समोर आली होती. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत चारही आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.

इम्रान असीर खान, वय 30 वर्षे, व्यवसाय नोकरी, मोहम्मद सलमान असीर खान, वय 29 वर्षे, चालक,  गुफारान असीर खान, वय 20 वर्षे, चालक आणि मोहम्मद मुजीद इब्रार अली, वय 22 वर्षे, चालक असे अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात देल्हूपूर पोलीस ठाणे, जिल्हा प्रतापगढ, राज्य उत्तरप्रदेश येथे हत्येचा गुन्हा नोंद आहे. यातील फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पुर्वीपासून वाद होते. 12 डिसेंबरला संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ रकिब व भाचा असफाक मोटर सायकलवरून देल्हूपूर बाजारातून घरी जात असताना आरोपींनी कारने रकिब व असफाक यांचे मोटर सायकलला ठोकर मारून त्यांना खाली पाडून हातातील लाठ्याकाठ्या व लोखंडी सळईने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपींनी त्यांचे हातातील अग्निशस्त्राने जखमींवर फायर करून त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या व शिविगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून तेथून पळून गेले. गुन्हयातील जखमी रकिब हा उपचारादरम्यान 16 जानेवारीला मयत झाला. 

या गुन्हयातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाल्याने व त्यातील चार आरोपी हे नवी मुंबई परीसरात वास्तव्यास असल्याबाबत माहिती समोर आली. सदर आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या वेगवेगळया टिम तयार करून आरोपींचा सर्वोतोपरी शोध सुरू करण्यात आला. आरोपी हे खारघर परिसरात असल्याबाबत गोपनिय माहिती खात्रीलायक बातमीदाराकडुन प्राप्त केली. सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सेक्टर 8, खारघर येथे जावून सापळा लावून सदरचे आरोपी हे खारघर येथुन पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. रवींद्र पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) वरिष्ठांचे आदेशाने नमुद आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी देल्हूपुर पोलीस ठाणे, उत्तरप्रदेश येथील पोलीस उप निरीक्षक, राकेश चौरसीया व पोलीस पथकाचे ताब्यात देण्यात आले आहेत.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट