झक्कास, चटकदार शेवपुरी!!
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 17, 2023
- 667
शेवपुरी, पाणीपुरी असलं काही आठवलं तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मग तो पदार्थ जोपर्यंत आपल्या घशाखाली जात नाही, तोपर्यंत आपलं मन मानत नाही, अन्? आपली पावलं आपोआप वेळात वेळ काढून चटकदार अशा या चाट पदार्थ मिळणाऱ्या ठिकाणाकडे चालु लागतात. खवयांच्या पसंतीस उतरलेल्या आणि स्वादिष्ट शेवपुरी मिळणाऱ्या वाशीतील या ठिकाणाबद्दल आज आपणास माहिती करून देणार आहोत. जिथे शेवपुरी व तत्सम चाट पदार्थ खाण्याकरिता चक्क रांगेत उभे राहावे लागते. हे ठिकाण आहे वाशीतील सेक्टर 29 मधील ओम साई शेवपुरी अँड फास्ट फूड सेंटर. राजकपूर गुप्ता आणि त्यांचा मुलगा तपन गुप्ता यांनी चालवलेल्या या सेंटरला खवय्यांचा मोठा प्रतिसाद लाभतोय. इथल्या शेवपुरीची चव तोंडात दीर्घकाळ रेंगाळत राहते. शेवपुरी बरोबर पाणीपुरी, भेळपुरी, रगडापुरी, दहिपुरी, ओली व सुखी भेळ या सगळ्या पदार्थांची चव चाखण्यासाठी ग्राहकांची या ठिकाणी सायंकाळी नेहमी झुंबड उडते. पोटभर मिळणाऱ्या या पदार्थाची चव व गुणवत्ता उत्तम आहे. या शेवपुरीला लागणारी पुरी आणि शेव दोन्ही गुप्ता कुटुंब स्वतः बनवतात. तिखट गोड चटणी, पुदिना चटणी, चाट मसाला, कच्ची कैरी आणि मूग डाळ या शेवपुरीला भन्नाट चव आणतात. हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्हाला मात्र फक्त सायंकाळी 4 ते रात्री 11 च्या दरम्यानच यावे लागेल. या वेळेत दररोज सुमारे 200 ग्राहक येथे जिभेचे लाड पुरवण्यासाठी येतात. सुरुवातीला गोल्ड क्रेस्ट शाळेजवळ आणि कोरोना महामारीच्या काळानंतर आता शिवपूजा सोसायटी येथील गाळ्यामध्ये सुरू असलेल्या या व्यवसायाला सुमारे 24 वर्षांची परंपरा आहे. इथली शेवपुरी व अन्य पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची पावलं नेहमी चाट खाण्यासाठी नक्की इकडेच वळतील यात शंका नाही.
ठिकाण: शिवपूजा सोसायटी, शॉप नंबर 4, सेक्टर 29, वाशी, नवी मुंबई.
याचा आस्वाद घ्याल : शेवपुरी, पाणीपुरी, रगडापुरी, दहिपुरी, ओली भेळ, सुखी भेळ.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai