मुलांच्या डब्यासाठी झटपट पटापट टिप्स
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2026
- 23
व्हेजिटेबल पराठा रोल
साहित्य: गव्हाचे पीठ,किसलेले गाजर,बारीक चिरलेली कोबी,उकडलेला बटाटा,मीठ, हळद
कृती:पीठात भाज्या आणि मसाले मिसळून कणिक मळा. पराठे लाटून भाजून घ्या. रोल करून डब्यात ठेवा.
2. मूग डाळ चिल्ला
साहित्य: भिजवलेली मूग डाळ, कांदा, कोथिंबीर,मीठ
कृती: डाळ वाटून पीठ तयार करा. त्यात कांदा व कोथिंबीर घाला. तव्यावर चिल्ले बनवा.
3. व्हेजिटेबल पोहे कटलेट
साहित्य:भिजवलेले पोहे, उकडलेला बटाटा,गाजर, मटार,मीठ, चाट मसाला
कृती:सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.कटलेटचा आकार देऊन शॅलो फ्राय करा.
4. पनीर भुर्जी सँडविच
साहित्य : ब्रेड स्लाइस,पनीर, टोमॅटो, कांदा,बटर
कृती : पनीर भुर्जी तयार करा. ब्रेडमध्ये भरून सँडविच बनवा.
5. रवा इडली
साहित्य : रवा, दही, गाजर किस, मोहरी, कढीपत्ता
कृती : रवा, दही आणि भाज्या मिसळा. इडलीच्या साच्यात वाफवून घ्या.
6. चीज कॉर्न पराठा
साहित्य: उकडलेले स्वीट कॉर्न,किसलेले चीज,गव्हाचे पीठ
कृती: कॉर्न आणि चीजचे सारण तयार करा. पराठ्यात भरून भाजा.
7. व्हेजिटेबल शेवया उपमा
साहित्य: भाजलेल्या शेवया,गाजर, मटार, फरसबी,मोहरी, कढीपत्ता
कृती:फोडणी करून भाज्या परता. शेवया घालून शिजवा.
काही टिप्स
- रंगीबेरंगी भाज्यांचा वापर करा. फळांचे छोटे तुकडे सोबत द्या. खूप तिखट पदार्थ टाळा. प्रोटीनसाठी पनीर, मूग, अंडी (जर खात असतील तर) यांचा समावेश करा. पदार्थ छोटे आणि खाण्यास सोपे ठेवा.
- एका आठवड्याचा डबा प्लॅन:
- सोमवार: व्हेज पराठा + सफरचंद
- मंगळवार: मूग डाळ चिल्ला + केळी
- बुधवार: पनीर सँडविच + काकडी
- गुरुवार: रवा इडली + नारळ चटणी
- शुक्रवार: चीज कॉर्न पराठा + द्राक्षे
- शनिवार: पोहे कटलेट + फळे
- यामुळे मुलांना पौष्टिक, चविष्ट आणि रोज वेगळा डबा मिळेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai