डबा पौष्टिक बनवण्यासाठी टिप्स
- by मोना माळी-सणस
- Jul 07, 2026
- 25
दररोज किमान एक फळ डब्यात द्या. गाजर, बीट, मटार, कोबी यांसारख्या भाज्यांचा वापर वाढवा. प्रोटीनसाठी मूग, चणे, पनीर, दही किंवा अंडी (मुलांच्या आहारानुसार) समाविष्ट करा. जंक फूड, जास्त तेलकट आणि अतिगोड पदार्थ टाळा. मुलांना आवडतील अशा आकर्षक आकारात पदार्थ तयार करा. दर आठवड्याला नवीन पदार्थांचा समावेश करून डब्यात वैविध्य ठेवा. अशा प्रकारे तयार केलेला डबा मुलांना पौष्टिक, चविष्ट आणि रोज वेगळा अनुभव देईल, तसेच त्यांची ऊर्जा आणि एकाग्रता टिकवून ठेवण्यास मदत करेल.
1. गाजर-बीट थेपला
फायदा : लोह, फायबर आणि व्हिटॅमिन्स भरपूर.
गव्हाच्या पिठात किसलेले गाजर, बीट, तीळ, कोथिंबीर मिसळून थेपले बनवा. दही किंवा चटणीसोबत द्या.
2. कॉर्न-चीज बॉल्स
उकडलेले स्वीट कॉर्न, बटाटा आणि चीज एकत्र करून छोटे बॉल्स बनवा. शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय करा.
3. पालक पराठा पिझ्झा
पालक खाण्यासाठी उत्तम पर्याय. पालकाचा पराठा बनवा. वर चीज, कॉर्न, टोमॅटो घालून तव्यावरच मिनी पिझ्झा तयार करा.
4. व्हेजिटेबल फ्राईड राईस
फायदा : उरलेल्या भाताचा उत्तम उपयोग.
गाजर, मटार, शिमला मिरची परतून त्यात भात मिसळा. थोडे बटर घालून चव वाढवा.
5. ओट्स-भाजी उत्तप्पा
फायदा : फायबर आणि प्रोटीनयुक्त.
ओट्स पावडर, रवा आणि दही मिसळून पीठ तयार करा. वर भाज्या घालून उत्तप्पा बनवा.
6. स्टफ्ड इडली
फायदा : साध्या इडलीला नवा ट्विस्ट.
इडलीच्या मिश्रणात बटाटा किंवा पनीर मसाला भरून वाफवा.
7. पनीर पराठा पॉकेट्स
फायदा : प्रोटीनने भरपूर.
पनीर, कॉर्न आणि थोडे चीज भरून चौकोनी पराठे बनवा.
8. केळी-ड्रायफ्रूट पॅनकेक
फायदा : साखरेशिवाय गोड पदार्थ.
केळी, गव्हाचे पीठ आणि दूध यांचे मिश्रण करून पॅनकेक तयार करा.वर ड्रायफ्रूट्स घाला. 9. व्हेजिटेबल सेवई नूडल्सफायदा: मैद्याच्या नूडल्सपेक्षा अधिक पौष्टिक. भाजलेल्या शेवया आणि भरपूर भाज्या वापरून तयार करा.
10. स्प्राउट्स टिक्की फा
9. स्प्राउट्स टिक्की
फायदा : प्रोटीन आणि मिनरल्सचा उत्तम स्रोत. मोड आलेले मूग, बटाटा आणि भाज्या एकत्र करून टिक्की बनवा.
11. एग मफिन्स (अंडी खात असतील तर)अंडी, भाज्या आणि चीज मिसळून मफिन मोल्डमध्ये बेक करा. थंड झाल्यावर डब्यात ठेवा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस