बुलेट चोरणारे त्रिकुट जेरबंद
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2023
- 414
19 लाख 50 हजारच्या 20 गाड्या जप्त
नवी मुंबई : तरूणांमध्ये क्रेझ असलेल्या रॉयल इनफिल्ड बुलेट व बजाज पल्सर 220 या मोटारसायकल वाहनांची चोरी करणाऱ्या त्रिकुटास नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी एकुण 19 लाख 50 हजार रुपयांच्या 20 बाईक्स जप्त केल्या आहेत.
निमेश सोपान कांबळे, (वय 21 वर्षे ) , प्रथमेश राजु सपकाळ, (वय 21 वर्षे) गौरव आनंदा कदम (वय 19 ) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नवी मुंबईत बाईकच्या चोरीत वाढ होत असल्याने या चोरट्यांना पकडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान महाबळेश्वर नजीक मेढा येथे एक बुलेट बेवारस अवस्थेत सापडली. स्थानिक पोलिसांनी दुचाकी क्रमांकावरून गाडीचे मालक शोधले व या बाबत नवी मुंबई पोलिसांना माहिती दिली. ही बुलेट ज्या ठिकाणाहून चोरी झाली होती. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि खबरी असा सर्व स्तरातून तपास करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. त्यांची चौकशी करून तब्बल 20 गुन्हे उकल झाली आहे. यातील काही गाड्या या टोकन देऊन विकत घेतल्या मात्र नंतर गाडी इतरांना विकण्यात आल्या. आरोपीकडून अजून गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai