खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पांढऱ्या पोषाखातला लुटारू!

व्यवस्थेला पोखरून स्वत:चे खिसे भरणाऱ्या पांढऱ्या पोषाखातल्या नव्या डाकूचा सीबीआयने नुकताच शोध लावला आहे. या डाकूने त्याच्या इलाख्यातील जंगलांची लयलूट केलीच, पण आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्याला शहरात घुसण्याचा मार्ग भाजपने आखून दिला. त्रासदायक ठरलेल्या चार यंत्रणांमधील नाकोर्टिक ही आणखी एक संस्था बनली. आता अति झाल्यावर या डाकूवर छापेमारी सुरू झाली आहे. पांढऱ्या डगल्यातला हा इसम यंत्रणेला पोखरतो आहे, असा जाहीर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवून देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या अतिआत्मविश्वासूंनी या डाकूला साथ दिली. खऱ्याचं खोटं करणाऱ्या  या इसमाचं नाव आहे अर्थातच समीर वानखेडे. एका महत्वपूर्ण खात्याच्या विभागीय जबाबदारीतून समीरचा अमीर कधी झाला हे कोणालाच कळलं नाही. यंत्रणेत ठराविकच माणसं नेमण्याचा दिल्लीश्वरांच्या हट्टापायी हे सारं घडत गेलं आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुजरातला नवं आंदण मिळालं. विरोधी पक्षांचे नेते या पांढऱ्या पोषाखातल्या लुटारु विषयी खूप काही सांगायचे. पण राज्याचं गृहखातं सांभाळणाऱ्या फडणवीसांचे कान बंद होते. विरोधी पक्षांना दाबणारा, त्यांच्या नेत्यांना ठरवून अडकवेल अशी माणसं यंत्रणेत असतील तर आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नसते, हे हेरणाऱ्या दिल्लीतल्या अमित शहांनी आणि महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांनी असे असंख्य चोर यंत्रणेत आणून बसवले आहेत. त्यातल्या एका परमवीर नामक दरोडेखोराला लुटीतून साव बनवण्याचं पातक कसं केलं गेलं याचं साद्यंत आपण गेल्या आठवड्यात मांडलं. त्याच माळेतल्या वानखेडेंच्या काळ्या उद्योगांचा पंचनामा करणं तितकंच आगत्याचं आहे. म्हातारी मेल्याच्या दु:खाहून काळ सोकावतो हे अत्यंत वाईट. वानखेडेंमुळे काळ सोकावू लागला आहे.

दीड वर्षापूर्वी म्हणजे 2 आक्टोबर 2021 या दिवशी मुंबईतल्या कार्डेलिया नामक क्रूजवर छापा पडतो काय आणि त्यात शाहरुख खान याच्या मुलाला ताब्यात घेतलं जातं काय, सारं अचंबित करणारी घटना होती. शाहरुख पुत्राला अटक झाल्याने हे प्रकरण हायप्रोफाईल बनणं स्वाभाविक होतं. शाहरुख पुत्राला अटक करायची आणि कोट्यवधी रुपयांची कमाई करायची असले उद्योग डोक्यात घोळत होते. अशा बड्या धेंडांना ताब्यात घ्यायचं, त्यांच्याविषयी जुजबी पुरावे निर्माण करायचे, ठरवलेल्या के.पी.गोसावी सारख्यांना एकसारखं पंच बनवणं असल्या गोष्टी वानखेडेंच्या पचनी पडत होत्या. देशातल्या नव्या पिढीला बरबाद करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याच्या कारणास्तव तथाकथित देशप्रेमींकडून समीरचं कौतुक होत असताना आर्यनला मात्र शिव्यांच्या लाखोल्या पडत होत्या. त्यात फडणवीस गँगसाठी वानखेडे ही चालून आलेली संधी होती. मुंबईच्या मायानगरीत अशी उघड लूट करायची आणि याच लुटारुंचा साथीदार बनण्याचे पाप या मंडळींनी केले. यामुळे आरोप खरे असूनही नवाब मलिक यांच्यासारख्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले. समीरबरोबरच के.पी.गोसावी आणि सॅम्युअल डिसुझा यांच्या या काळ्या उद्योगांचा भांडाफोड झाल्यापासून ही गँग लपून बसली होती. भारतीय जनता पक्षाचे पाठीराखे असलेल्या या मंडळींनी अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आवर घालण्याऐवजी तिला प्रोत्साहन दिलं आणि नव्या पिढीला नशेच्या खायित लोटलं. वानखेडे वगळता नार्कोटिक विभागाशी गोसावी, डिसोझा, भानुशाली आणि पाटील नामक व्यक्तीचा काहीही संबंध नव्हता. पण कमाईच्या हव्यासापोटी त्यांना कामाला लावण्यात आलं. आणि सहजरित्या आर्यनला ताब्यात घेण्याचे उद्योग त्यांनी केले. ज्या गोसावीची मदत नाकोटिकच्या वानखेडे घ्यायचा तो गासावी अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. तो सापडत नसल्याचं सांगणारे पोलीस याच गोसावीच्या मदतीत खोट्या गुन्ह्यांची नोंद करत होते. तेव्हाही पोलिसांच्या गृहविभागाचे प्रमुख हे फडणवीस होते. अनेक वर्ष हा गोसावी महाराष्ट्रातून फरार असल्याचं पोलीस सांगत. तोच गोसावी नार्कोटिकच्या कार्यालयात दिवसभर येरझाऱ्या मारत असल्याची माहिती सीसीटीव्ही दाखवत होतं. आदिल उस्मानी, सच्चा पटेल, ईलू पठाण ही माणसं दरवाजाआड वानखेडेसाठी काम करायची आणि वानखेडे नामेनिराळा राहायचा. शाहरुखचा मुलगा आर्यन हा सेलिब्रेटी असल्याने गोसावीने थेट नार्कोटिकच्या तुरुंगात जाऊन आर्यनसोबत सेल्फी घेतली आणि या घटनेचा  भांडाफोड झाला. आरोपीसोबत गोसावीने घेतलेली सेल्फी वानखेडेला महाग पडली.  

मोठ्या हस्तींना ताब्यात घ्यायचं त्यांच्याविरोधात खोटेनाटे आरोप करायचे आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळायचे हा गोरख धंदा वानखेडे कंपनीने सुरू केला होता. देशात वानखेडेंसारखा प्रामाणिक जणू कोणीच नाही, असा अविर्भाव या सगळ्यांचा असायचा. प्रामाणिकपणाच्या या बुरख्यात वानखेडेने इतकी कमाई केली की त्याची मोजदाज करण्याची वेळ सीबीआयवर येऊन पडली. 25 कोटींच्या मागणीसाठी आर्यनला अडकवलं जात असल्याचा आरोप तेव्हा नवाब मलिक यांनी केला होता. तो तेव्हाच खरा ठरला जेव्हा 25 कोटींची ही डील 18 कोटींवर येऊन ठेपली. यातील 50 लाखांचा बयाणा घेण्यासाठी गोसावी मुंबईत पोहोचला आणि अखेर ते पैसे नवी मुंबईत वाशीच्या पुलाखाली वानखेडेपर्यंत पोहोचवल्याचं उघड झालं. इतकं घडूनही फडणवीस गँग नाकावरची माशी हटवत नव्हते. मलिक यांना गृहखातं सांभाळणाऱ्या फडणवीसांनी तर साथ दिली नाहीच, उलट त्यांनाच खोटं ठरवत त्यांचं उट्टं काढलं. भाजपचा बोलघेवडे आणि बेताल आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर हद्दच गाठली होती. वानखेडेंची कारवाई योग्य ठरवत हे सगळे दिल्ली सरकारला शाबासकी देत होते. वास्तविक ज्यांच्याकडे अंमली पदार्थांना अटकाव घालण्याची जबाबदारी होती त्या वानखेडे गँगहून चांगली कामगिरी राज्यातल्या पोलिसांनी केल्याचं उघड असताना भातखळकर खोटारडेपणा करत होते. आता वानखेडेंच्या मुसक्या आवळल्या जाऊ लागल्यापासून हे आमदार कोणत्या बिळात लपलेत हे कळत नाही. समीर हा मागासवर्गीय असल्याने महाविकास आघाडीचं सरकार त्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजपचे नेते करत होते. वानखेडेंकडेे महागडे कपडे, त्यांच्या महागड्या गाड्या, महागडी घड्याळं, लाखमोलाचे कमरपट्टे, अडीच लाखांची बुटं इतका पैसा लाखाच्या पगारातल्या अधिकाऱ्याकडे येतो कुठून, अशी शंका वानखेडेंची बाजू घेणाऱ्या भाजपच्या एकाही नेत्याला तेव्हा आली नाही. समीरचा भांडाफोड करणाऱ्या प्रभाकर साईलचा संशयास्पदरित्या मृत्यू होणं यावरून हे प्रकरण कोणत्या पातळीचं आहे, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. हे सारं पाहता सत्तेच्या माणसांची फूस वानखेडेला होती, हे लपून राहू शकत नाही. आता फडणवीसपासून भातखळकर, किरीट, कंबोज यांची भूमिका काय हे देशाला कळलं पाहिजे.   


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट