खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


एमपीएससीची हॉलतिकीट हॅकर्सला अटक

नवी मुंबई ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) वेबसाइटवर टाकण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षेची तब्बल 94,195 हॉल तिकिटे बेकायदेशीररित्या डाऊनलोड करून ही टेलिग्रामवर प्रसारित करणाऱ्या सायबर आणि डिजिटल सायन्सच्या एका विद्यार्थाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली आहे. डार्क नेटवरून मिळालेल्या 400 डॉलरच्या सुपारीसाठी त्याने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. तो डार्कनेटवरील काही हॅकर्सच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.

रोहित दत्तात्रय कांबळे (वय 19) असे या तरुणाचे नाव असून तो सायबर आणि डिजिटल सायन्सचा विद्यार्थी असून द्वितीय वर्षात शिकत आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब आणि गट ‘क'च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या उमेदवारांची हॉल तिकिटे 28 एप्रिलला आपल्या वेबसाइटवर टाकली होती. ही हॉल तिकिटे उमेदवारांच्या सोयीसाठी बाह्य लिंकद्वारे आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली होती. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेत अज्ञात हॅकरने आयोगाने वेबसाइटवर टाकलेल्या बाह्य लिंकमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्यातील माहिती अवैधरित्या प्राप्त करून त्याद्वारे वेबसाइटवरील तब्बल 94,195 उमेदवारांची हॉल तिकिटे डाऊनलोड केली होती. त्यानंतर हॅकरने हो हॉल तिकिटांचा डाटा एमपीएससी 2023 ए या ‘टेलिग्राम'च्या चॅनलवर बेकायदेशीरीत्या प्रसारित केला होता.

या प्रकारानंतर एमपीएससीच्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. या तपासात सायबर सेलंचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करून अज्ञात हॅकरने गुन्हा करताना वापरलेला आयपी ॲड्रेस मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित दत्तात्रय कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटीलनगर येथून बुधवारी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी रोहित कांबळे याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेला 1 डेस्कटॉप, 1 लॅपटॉप, 3 मोबाइल फोन व एक इंटरनेट राऊटर असे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळेने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. रोहित कांबळेने डार्क नेटवरील साथीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त भारंबे यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला 27 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठवल्याचेही त्यांनी सांगितले. 

डार्कनेटच्या माध्यमातून तो काही हॅकर्सच्या संपर्कात होता. त्याच ठिकाणी त्याला एमपीएससीच्या वेबसाइटवरून प्रश्नपत्रिका व प्रवेशपत्र हॅक करण्याची 400 डॉलरची सुपारी मिळाली होती. मात्र वेबसाईटवर केवळ प्रवेशपत्रिका असल्याने त्याने 94 हजार प्रवेशपत्रिका चोरून त्या टेलिग्रामवरील ग्रुपवर टाकल्या होत्या. यामुळे सदर प्रकार उघड झाला होता. त्याची आई शिक्षिका तर वडील पत्रकार आहेत. सायबर विषयात आवड असल्याने त्याने त्याच विषयात शिक्षण घेण्याचे ठरवले होते. दरम्यान तो हॅकर्सच्या संपर्कात आल्याने तो गुन्हेगारी मार्गाला लागला होता.

  • हॅकिंगसाठी 400 डॉलरची सुपारी
    पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळे हा बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून, त्याने सायबर सेक्युरिटीचे विविध प्रकारचे कोर्सेस केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच तो डार्क नेटवरील काही हॅकर्सच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले असून, डार्कनेटवरील हॅकर्सनी त्याला एमपीएससीच्या वेबसाइटवरून उमेदवारांचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेचे प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल 400 डॉलरची सुपारी दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसाकडून पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट