सायबर चोरांकडून 11 लाखांचा गंडा
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2023
- 464
नवी मुंबई : ऑनलाईन पार्ट टाईम जॉब देण्याचे प्रलोभन देऊन एका सायबर चोरांच्या टोळीने सानपाडा भागात राहणाऱ्या एका महिलेला 11 लाख 9 हजार रुपयांचा गंडा घातला. सानपाडा पोलिसांनी या प्रकरणातील आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सानपाडा येथे पतीसह राहणाऱ्या 41 वर्षीय महिलेच्या पतीची हाऊस कीपिंगची कंपनी आहे. एप्रिल महिन्यात सायबर चोरांनी या महिलेशी व्हॉट्सॲपवर ऑरकल कम्युनिकेशन नावाचे ऑनलाईन पार्टटाईम जॉब देण्याबाबतचा मेसेज पाठवला होता. या मेसेजला या महिलेने प्रतिसाद दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सायबर चोरांनी या महिलेला युट्युबमधील व्हिडीओ बघून एक टास्क दिला. तसेच हा टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम महिलेच्या बँक खात्यात जमा होईल, असे सांगितले होते. त्यानंतर या महिलेच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून त्यात रजिस्टर करण्यास सांगितले होते. त्यामुळे संबंधित महिलेने टास्क पूर्ण करत तब्बल 11 लाख 9 हजार 500 रुपये भरले आहेत. मात्र, त्यानंतर रक्कम परत करण्यात येत नसल्याने अखेर याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai