रबाळे एमआयडीसीतील बारवर छापा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 06, 2023
- 572
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीतील मायरा बार ॲण्ड ऑर्केस्ट्रा लेडीज बारवर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने छापा मारला होता. या कारवाईत 37 महिला वेटर, तसेच 17 पुरुष वेटरसह बार मॅनेजर, गायक अशा 54 जणांना ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई शहरातील अनेक लेडीज बार वेळेपेक्षा अधिक वेळ चालवून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच अनेक बारमध्ये महिला वेटरकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गैरकृत्य करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नियमभंग करणाऱ्या सर्व बारची पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे. रबाळे एमआयडीसीतील मायरा ऑर्केस्ट्रा बारवर शनिवारी (ता. 3) पहाटे दोनच्या सुमारास पाहणी केली असता अश्लील हावभाव होत असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai