प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2023
- 460
अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती
मुंबई ः गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये झालेल्या164 व्या प्राप्ती कर दिवस समारंभात सीतारामन बोलत होत्या. कर संकलन प्रणालीतील कार्यक्षमतेमुळे करसंकलनातील वाढीला चालना मिळाली असून भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक सूत्रबद्ध होत असल्याचेही अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या.
तंत्रज्ञानामुळे आयकर मूल्यांकनात सकारात्मक बदल घडून आल्याचे सांगत त्यांनी सीबीडीटीच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच नव्या कर प्रणालीत करदात्यांना त्यांचे वार्षिक उत्पन्न सात लाख 27 हजारांपर्यंत असल्यास कर भरावा लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai