कळंबुसरेत 13 जुगाऱ्यांना अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 18, 2023
- 465
उरण ः तालुक्यातील कळंबूसरे गावात नवरात्रीत तीन पत्त्यांचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्यांवर उरण पोलिसांनी अचानकपणे धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी 13 जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख 48 हजार 490 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नवरात्रीच्या उत्सवात उरण तालुक्यातील कळंबूसरे गावात जुगाराचा डाव चालत असल्याची कुणकुण उरण पोलिसांना लागली होती. खात्रीशीर माहिती मिळताच उरण पोलिसांनी वपोनि सतीश निकम यांनी आपले सहकारी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कांबळे, सपोनि गणेश शिंदे यांच्या मदतीने सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली. या धाडीत एका अंगणात तीन पत्याचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्या 13 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 48 हजार 490 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai