हिप-हॉप विजय डीकेच्या 4Three4Life अल्बमला मिळतोय उत्तम प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 07, 2023
- 462
आपल्या खास देसी स्ट्रिट स्टाईल परफॉर्मन्समधून दिल से दिल तक, गुसबम्प्स आणि ब्ल्युब्लड सारखी सुपरहिट गाणी देणारा 23 वर्षाचा यंग हिप-हॉप कलाकार विजय डीके हे नाव इतकं लोकप्रिय ठरलंय की बस, नाम ही काफी है असं म्हटलं तरी हरकत नाही. विजय डीके च्या प्रॉडक्शनमध्ये जास्त प्रमाणात किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात बोलली जाणारी भाषा आणि मराठी सॅम्पल्स असं एक फ्युजन तयार केलं आहे. यावर्षी विजय डीके याच्या गुसबम्प्स गाण्याच्या व्हिडिओला 1.7 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत, तसेच, K H N H ला 9.7 मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून दिल से दिल तक ने 13 मिलिअन व्ह्युजचा टप्पा गाठला आहे.
बहु-भाषिक हिप-हॉप कलाकार म्हणून, विजय डीके ने ब्लूब्लड या व्हायरल ट्रॅकने युट्युबवर 10 मिलिअन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून सर्व फॅन्स, प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळवली. 2022 मध्ये, त्याच्या बॉम्बे के डॉनया गाण्याने 5.4 मिलिअन व्ह्यूज मिळवले तर लॉकअप नंबर 4 ने 7.4 मिलिअन व्ह्यूज मिळवले. लोकपरंपरागत बासरीच्या सॅम्पल्सने आणि ग्रुव्ही ट्रॅप बीट्सच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या गाण्यांच्या मार्फत स्ट्रीट्स ऑफ मुंबई हा विषय आणि भावना अतिशय अचूक अधोरेखित करण्यात आले आहे. त्याच्या युट्युब चॅनेलवरील बरीचशी गाणी मिलिअनच्या घरात पोहोचली आहे, इतकंच नव्हे तर प्रत्येक गाण्याचे त्याच्या फॅन्सने कौतुक केले आहे.
विजय डीकेची युट्युब चॅनेलवर नुकतीच रिलीज झालेली 4Three4Life अल्बम मधील अदाकारी (इंट्रो), विजय डीके इन दि हाऊस, वॉर्निंग, सर्वस्व, नोबक्षिस, चार तीन की टोली ही गाणी फक्त ऐकण्या पूरती मर्यादित राहणार नाही तर ही गाणी त्यांच्या त्यांच्या शैलीचा एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना देऊन जाईल हे नक्की. विशेष करुन अदाकारी (इंट्रो) गाण्यात अनुभवण्याची एक वेगळीच मजा आहे. अंतरिक्ष निर्मित अदाकारी (इंट्रो),विजय डीके इन दि हाऊस, सर्वस्व', ‘नोबक्षिस' गाण्यांचा कंपोझर, परफॉर्मर आणि गीतकार विजय डीके आहे. ‘वॉर्निंग' विजय डीके ने कंपोझ केलं आहे, ते गाणं विजय डीके आणि कलम इंक यांनी गायले असून गाण्याचे शब्द देखील त्यांनीच लिहिले आहेत. चार तीन की टोली हे विजय डीके, एँडी सिरदर्द, डी. ई. सिद, विजय दादा आणि वेस्को यांनी गायले आहे. विजय डीकेच्या प्रत्येक गाण्याला जशी त्याच्या फॅन्सची साथ मिळाली त्याचप्रमाणे त्याच्यातील टॅलेंट जाणून घेऊन योग्य असा मंच देण्यासाठी त्याला ‘बिलिव्ह आर्टिस्ट सर्व्हिसेस' कंपनीची देखील मोलाची साथ मिळाली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai