ड्रग्ज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2023
- 437
6 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; नवी मुंबई पोलीसांची कामगिरी
नवी मुंबई ः पेंट बनवण्याच्या नावाखाली एमडी ड्रग्जचा कारखाना चालविणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी तब्बल 5 कोटी 39 लाख 60 हजार रुपये किमतीचे 5 किलो 396 ग्रॅम वजनाचे एम.डी.(मेफेड्रॉन) अंमली पदार्थ तसेच मेफेड्रॉन अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारे 45 लाख रुपये किमंतीचे साहित्य आणि कच्चा माल जप्त केला आहे. तसेच 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे.
सदर टोळी खोपोली मधील एका बंद पडलेल्या कंपनीतून आणि खोपोली-पाली रोडवरील एका फार्महाऊस मधून एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज बनविण्याचेे कारखाने चालवित असल्याचे उघडकीस आले आहे. तीन डिसेंबरला केलेल्या कारवाईची माहिती गुरुवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सभागृहात पत्रकार परिषदेत नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शादाब सईद सय्यद (वय-42), सोहेल मुन्नवर अली लांबे (वय-38), वजहुल वफा चौधरी (वय-55), सैफुल्ला शेख उर्फ सैफ बटाटा (वय-28), मोहसीन अन्सारी (वय-36), सीदधा पाल (वय-33) या सहा जणांचा समावेश आहे. यातील सैफुल्ला शेख, फायनान्सर असून त्याचा खोपोली-पाली रोडवर उंबरे गाव येथे फार्महाऊस आहे. या टोळीने खोपोलीतील एक बंद पडलेली कंपनी पेंट बनविण्याच्या बहाण्याने भाड्याने घ्ोऊन त्याठिकाणी आणि सैफुल्ला शेख याच्या फार्महाऊसमध्ये एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज बनविणारे कारखाने सुरु केले होते. त्यानंतर या टोळीने एका विक्रेत्याकडून एम.डी. बनविण्यासाठी लागणारे केमिकल आणि कच्चा माल घ्ोऊन मोठ्या प्रमाणात एम.डी.ड्रग तयार केले होते. याच टोळीतील एक व्यक्ती गत 3 डिसेंबर रोजी मुंबई-गोवा महामार्गावर शिरढोण गावाजवळ एम.डी. (मेफेड्रॉन) नामक अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला असताना नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला अटक केली होती. तसेच त्याच्या ताब्यात असलेला 6 लाख 10 हजार रुपये किंमतीचा 61 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थ जप्त केला होता. सध्या बाजारात पुरवठा केला जाणारा अंमली पदार्थ परदेशातून येत नसून त्याची निर्मिती येथेच केली जात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी अजून तीन जणांना बदलापूर, ठाणे व खालापूर येथून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत ते खोपोली येथील ढेकु गावालगतच्या एका बंद पडलेल्या कंपनीत आणि खोपाली-पाली रोडवरील उंबरे गाव येथील फार्महाऊस मधुन एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज बनविणारे कारखाने चालवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश घुमाळ आणि पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे यांची दोन पथके तयार करुन खोपोली, खालापुर येथील बंद कंपनी आणि फार्महाऊसवर छापे टाकले. यावेळी सदर ठिकाणी सापडलेले 5 कोटी 39 लाख 60 हजार किमतीचे 5 किलो 396 ग्रॅम वजनाचे एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ तसेच मेफेड्रॉन पदार्थ बनविण्यासाठी लागणारे 330 लिटर केमिकल्स, 25 किलो पावडर असा 45 लाख रुपये किंमतीचा कच्चा माल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी सदर कंपनी आणि फार्महाऊस सिल करुन आरोपीची दोन चार चाकी वाहने, 9 मोबाईल फोन देखील जप्त केली आहेत.
पोलीस कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी 31 डिसेंबर रोजीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात एमडी तयार करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. या टोळीमध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून, गुन्हे शाखेकडून त्याबाबबत अधिक तपास करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या आजुबाजुच्या पलॅट अथवा बंद कंपनीमध्ये अशा प्रकारचे काही संशयास्पद आढळून आल्यास त्यांनी पोलिसांच्या 112 नंबरवर संपर्क साधुन त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाख) अमित काळे, यांनी केले आहे.
यातील आरोपीत वजहुल चौधरी याच्यावर यापुर्वी डीआरआयने कारवाई केली असून, 16 वर्षे तो कारागृहात होता. तसेच सैफुल्ला शेख उर्फ सैफ बटाटा याच्यावर देखील नाशिक येथे अंमली पदार्थाशी संबधित गुन्हे दाखल आहेत. कारागृहात सदर आरोपी काही गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी एमडी बनविण्याचे ऑनलाईन व्हिडीओ पाहून एमडी बनविण्यास सुरुवात केल्याचे पोलीस तपासात आढळुन आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai