जरांगे यांचा आज वाशीतच मुक्काम
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 26, 2024
- 387
नवी मुंबई ः मनोज जरांगे यांनी सरकारला केलेल्या मागण्यांचा आजच अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी 11 डेडलाईन मनोज जरांगे यांनी सरकारला दिली आहे. तोपर्यंत वाशीतच मुक्ाम करण्याचे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले आहे.
अध्यादेश काढला तरी गुलाल उधळायला आझाद मैदानावर जाणारच. अध्यादेश नाही काढला तर उपोषणासाठी आझाद मैदान गाठणार पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. काही झाले तरी मागे वळणार नाही, आरक्षण घेऊनच जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाचा मान ठेवून मी आझाद मैदानावर जाणार नाही. आजची रात्र इथंच काढतो, पण आज रात्रीपर्यंत अध्यादेश इथं आणून द्या. रात्रभर अध्यादेशाचा अभ्यास करु, त्यामध्ये काही खोटंनाटं असेल तर त्याचा किस पाडू. हवं तर आझाद मैदानाऐवजी वाशीतच थांबतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. मी शब्द देतो की एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. आज रात्रीपर्यंत आम्हाला हा अध्यादेश द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली आहे.
उपस्थित मोर्चेकरांना, त्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये शांततेत प्रस्थान करण्यास सांगितले आहे. तसेच येथील स्थानिकांना, नवी मुंबईकरांना या मराठी बांधवांसाठी जेवण-पाण्याची सोय करुन सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai