Breaking News
मुंबई : दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्सच्या विमानाला घाटकोपर येथे सोमवारी रात्री 8.40 वाजता धडक देऊन 39 फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनविभागाने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे राज्याचे अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांनी सांगितले.
20 मे रोजी रात्री 8:40 वाजता घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर-पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगो 39 पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी सुरू केली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे हे कर्मचाऱ्यांना घेऊन अपघातस्थळाची पाहणी करून 29 मृतपक्षी ताब्यात घेतले. 21 मे रोजी सकाळी पुन्हा पाहणी केली असता आणखी 10 मृत पक्षी सापडले. या सर्व मृत पक्ष्यांचे ऐरोलीतील वन विभागाच्या सागरी-किनारी जैवविविधता केंद्रात शवविच्छेदन करण्यात येत आहे. दीपक खाडेंचे पथक करणार तपासया संपूर्ण घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे करीत असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai