पोलीस भरती लेखी परीक्षा सुरळीत
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2024
- 401
12 परीक्षार्थी गैरहजर, 1 हजार 830 जणांनी दिली परीक्षा
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस भरतीतील दुसरा महत्वाचा टप्पा असलेली लेखी 7 जुलैला पार पडली. पावसाचा अंदाज बघता सुटसुटीत असणारे परीक्षा केंद्र म्हणून वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात सदर परीक्षा घेण्यात आली.
नवी मुंबई पोलीस विभागातील शिपाई संवर्गातील 185 पदांच्या लेखी परीक्षेसाठी 1 हजार 399 पुरुष तर 443 महिला परीक्षार्थी होत्या. मात्र त्यात 10 पुरुष आणि 2 महिला गैर हजर राहिल्या उर्वरित 1 हजार 389 पुरुष आणि 441 महिलांनी सदर परीक्षा दिली. हि परीक्षा सिडको प्रदर्शनी केंद्रात 10 ते साडे अकरा दरम्यान झाली असली तरी प्रत्यक्षात सकाळी 7 वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे सकाळी साडे सहा पासूनच परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थी दिसून येत होते. 27 जूनला मैदानी परीक्षा संपल्यानंतर 5 हजार 984 मधून 1 हजार 842 पात्र उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले. यामध्ये 1399 पुरुष आणि 443 महिलांचा समावेश होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाहेरील येणाऱ्या उमेदवारांना रविवारी परिक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी पनवेल, मानसरोवर आणि वाशी रेल्वे स्थानकातून शासकीय वाहनांची सोय नवी मुंबई पोलीसांनी केली होती. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा अशा आधुनिक साधनांची मदत घेण्यात आली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai